शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी - हरिष भालेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:16 IST

देशात उच्चप्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व प्राचार्य डॉ. हरिष भालेराव

ठळक मुद्देकोल्हापूर  शिवाजी विद्यापीठातील व्याख्यान

कोल्हापूर : देशात उच्चप्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी सोमवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मानव्यशास्त्र अधिविभागातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. डॉ. भालेराव म्हणाले, नागरिकांना मुक्त वातावरणात जीवन जगता आले पाहिजे. यासाठी मूलभूत हक्कांची गरज असते. प्रत्येक भारतीयाचे राहणीमान उंचावून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि त्यांच्या मनात उच्चनीचतेची, परस्परांबद्दल श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना निर्माण न होऊ देणे या गोष्टी संविधानाला अभिप्रेत आहेत.

डॉ. शिर्के म्हणाले, संविधान हे केवळ पुस्तक नसून बाबासाहेबांनी या देशाला दिलेला मानवी मूल्यांचा दस्तावेज आहे. यासंदर्भात जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. या कार्यक्रमात संविधान दूतांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, प्रमोद वासंबेकर,के. डी. सोनवणे, आर. जी. सोनकवडे, प्रा. शोभा शेटे, पी. एस. पांडव, आनंद खामकर, सचिन देठे उपस्थित होते. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. वैभव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी आभार मानले.भालेराव म्हणाले* राज्याने कसे वागावे, हे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. ती राज्याची धोरणांबाबतची नैतिकता आहे.* विकास, चौकसबुद्धी, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देणारी आपली मार्गदर्शक तत्त्वे आहेत.* धोरणे आखताना या तत्त्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाजी विद्यापीठात सोमवारी संविधानदिनानिमित्त प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांचे व्याख्यान झाले. 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर